👀 'टिकटॉक प्रो'फेक लिंकपासून सावध रहा!


🎯 सध्या सायबर भामट्यांनी फेक टीकटॉक प्रो लिंक बनविली असून त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.

🤓 तुमची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे असल्याने ते या फेक लिंकचा प्रसार व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस व SMS द्वारे करत आहेत.

📣 'महाराष्ट्र सायबर'चे आवाहन :

● तुम्ही अशा कोणत्याही मेसेजच्या लिंकवर क्लिक करु नये.
● तसेच हे लक्षात ठेवा की, अशा लिंक्सद्वारे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे यापासून सावध असावे.

💫 तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असेही सांगण्यात आले आहे.