🚫 रात्रीच्या वेळी 'हे' पदार्थ खाणे टाळा!


अनेकदा वजन कमी करण्यासाठी खूप सारा अट्टाहास करतो. मात्र आपण काही अशा चुका करतो ज्यामुळे आपले वजन कमी होतच नाही. रात्री काहीही खाणे त्यापैकीच एक चूक आहे. म्हणूनच आज आपण रात्री कोणते पदार्थ खाणे टाळावे? त्याबाबत जाणून घेऊयात...

1. ड्राय फ्रुट्स : ड्रायफ्रूट्स रात्री झोपताना खाणे टाळले पाहिजे. कारण रात्री शरीर फार अ‍ॅक्टिव्ह नसते. अशात शरीरात निर्माण झालेल्या कॅलरीचा फार कमी वापर होतो आणि त्या कॅलरी शरीरात फॅटच्या स्वरूपात जमा होत राहतात.

2. चॉकलेट : ज्यांचे वजन जास्त आहे अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी चॉकलेट खाणे टाळले पाहिजे. कारण त्यात कॅलरी आणि फॅट अधिक प्रमाणात असतात.

3. फ्रुट ज्यूस : डबाबंद ज्यूसमध्ये शुगरचे प्रमाण भरपूर असते. सोबतच कोल्ड ड्रिंक्समध्ये सोडा, शुगरही असते. जे रात्री  खाणं अधिक चांगले ठरतं.

4. आईस्क्रीम : यामध्ये फॅट आणि आर्टिफिशियल शुगर अधिक प्रमाणात असते. ज्याने शरीरात कॅलरी इनटेक अधिक होते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर झोपण्यापूर्वी आईस्क्रीमही अजिबात खाऊ नका.

5. पिझ्झा : यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असल्याने रात्री पिझ्झा खाऊन झोपू नका.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.