🚫 भारतीय लष्कराकडून 'हे' 89 अ‍ॅप्स बॅन!


📍 भारतीय लष्कराने आपल्या जवानांना आणि कर्मचाऱ्यांना 89 अ‍ॅप्स डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.

🤓 ज्यामध्ये फेसबुक, टिकटॉक, ट्रूकॉलर, इंस्टाग्राम, PUBG इत्यादी अ‍ॅप्सचा समावेश आहे.

👍 जवानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

💁‍♂️ 15 जुलैपर्यंत खालील 89 अ‍ॅप्स स्मार्टफोनमधून काढून टाकण्याचे आदेश : 

● मेसेजिंग प्लॅटफॉर्म : वी चॅट, क्यूक्यू, किक, आऊ वो, निम्बज, हेलो, क्यू जोन, शेयर चॅट, वायबर, लाइन, आयएमओ, स्नो, टो टॉक, हाईक.

● व्हिडिओ होस्टिंग : टिक-टॉक, लाइकी, समोसा, क्वाली.

● कंटेंट शेयरिंग : शेयर इट, जेंडर, Zapya.

● वेब ब्राउजर : यूसी ब्राउजर, यूसी ब्राउजर मिनी.

● व्हिडिओ आणि लाईव स्ट्रिमिंग : लाईव्ह मी, बिगो लाईव्ह, झूम, फास्ट फिल्म्स, वी मेट, अप लाईव्ह, विगो व्हिडिओ.

● यूटिलिटी अ‍ॅप : कॅम स्कॅनर, ब्यूटी प्लस, ट्रू कॉलर.

● गेमिंग अ‍ॅप्स : PUBG, नोनो लाईव, क्लॅश ऑफ किंग्स, ऑल टेंसेंट गेमिंग अ‍ॅप्स, मोबाईल लीजेंड्स.

● ई कॉमर्स : अली एक्सप्रेस, कल्ब फॅक्ट्री, गियर बेस्ट, चायना ब्रांड्स, बँग गुड, मिनिन द बॉक्स, टायनी डील, डीएचएच गेट, लायटेन द बॉक्स, डिएक्स, एरिक डेस्क, जॉफुल, टिबीड्रेस, मोडिलिटी, रोजगल, शीन, रोमवी.

● डेटिंग अ‍ॅप : टिंडर, ट्रूअली मॅडली, हॅप्पन, आयल, कॉफी मीट्स बॅजल, वू, ओके क्यूपिड, हिंग, एझार, बम्बली, टॅनटॅन, एलीट सिंगल्स, टॅजेड, काउच सर्फिंग.

● अँटी व्हायरस : 360 सिक्योरिटी.

● फेसबुक, Baidu, इंस्टाग्राम, एलो, स्नॅपचॅट.

● न्यूज अ‍ॅप्स : न्यूज डॉग, डेली हंट.

● ऑनलाईन बुक रीडिंग : प्रतिलिपी, वोकल.

● हेल्थ अ‍ॅप : हील ऑफ वाई.

● लाईफस्टाईल अ‍ॅप : पॉपएक्सो.

● नॉलेज अ‍ॅप : वोकल.

● म्यूझिक अ‍ॅप्स : हंगामा.

● ब्लॉगिंग/मायक्रो ब्लॉगिंग : येल्प, तुम्बिर, रेडिट, फ्रेंड्स फीड, प्रायव्हेट ब्लॉग्स.