❤️ हृदयातील जखमा Wounds in the heart




हृदयातील जखमा सांडण्याआधी मांडीन म्हणते
वेदना त्या मनाच्या वाहण्याआधी साठविन म्हणते

दुखांच्या त्या नदीचा पूर वाहतोय ओसांडून
पूर्ववत व्हाव सारं म्हणून तिची ओटी भरीन म्हणते

संशयाचं वादळ अंगावर येतंय कसं धावून
त्या वादळालाही धैर्याने सामोर जाईन म्हणते

राक्षस रुपी राग ही येतो आहे आवेगान
या तुझ्या प्रतीमेलाही सावरून घेईन म्हणते

तिरस्कार तो तुझा येईल मगं अकांड तांडव करून
तशा उग्र रुपालाही शीतल मिठीत आळविन म्हणते

ही तामस वृत्त्ती तुझी मगं येईल वाद घालून
तिलाही तिच्या परीने आवरून ठेवीन म्हणते.

     ✍️  दिपाली साळेकर - खामकर.