🤓 सोमवारी कामावर जाण्याचा कंटाळा आला आहे? मग ‘हे’ करा!



रविवार नंतर आलेला सोमवार अनेकांना नको-नको वाटतो. कामावर जाण्याची तर मुळीच इच्छा नसते. अशावेळी खालील काही टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरतील.

1. दुसऱ्या दिवशीच्या कामाचा अंदाज यावा म्हणून रविवारच्या रात्री झोपण्याआधी E-mail, Massage , चेक करून घ्या. म्हणजे तुमचा कंटाळा निघून जाईल.

2. सोमवारी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी आधीच करून ठेवा. जेणेकरून सकाळी धावपळ होणार नाही.

3. आज आपल्याला काही नवीन शिकायला मिळेल? ही मानसिकता ठेऊन कामावर जा. अशाने उत्साह वाढेल.

4. आपल्या कामाचे संपूर्ण Timetable बनवा. यामुळे उद्या काय करायचे? हे माहित असते. यामुळे कंटाळा, मूड नाही असे प्रश्नच मनात येत नाही.

5. विशेषतः तुम्हाला आवडणारे कपडे घालून कामावर जा. यामुळे तुम्हाला आपसूकच फ्रेश वाटेल.

6. जास्त कंटाळा किंवा झोप येत असेल तर आवडीची गाणीही ऐका. याने नक्की फायदा होईल.