🤓 घरातील वस्तू स्वच्छ ठेवण्याच्या टिप्स


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊनचा कालावधी दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन स्वःतापासून ते घरापर्यंत सर्व गोष्टी स्वच्छ ठेवणे गरजचे बनले आहे. त्याबाबत जाऊन घेऊयात...     
Tips for keeping household items clean

1. चॉपिंग बोर्ड : लाकडी चॉपिंग बोर्डला भेगा पडणे, त्यात घाण साचून राहणे हे साहजिक आहे. अशात या बोर्डाला स्वच्छ करण्यासाठी त्यावर थोडं मीठ भुरभुरून देऊन त्याला अर्ध्या लिंबाच्या फोडीने स्वच्छ करून तसेच पडू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

2. काचेच्या प्लेट्स : जर काचेच्या प्लेट्सवर स्क्रॅच असल्यास त्यावर खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा) आणि पाणी घालून त्याची पेस्ट बनवून प्लेट्स वर लावा. नंतर धुवा आणि स्क्रॅच नाहीसे होतात.

3. स्पॉन्ज : स्पॉन्जमध्ये असंख्य जिवाणू असल्याने स्पॉन्जची स्वच्छता करण्यासाठी मायक्रोवेव्ह मध्ये 90 सेकंदासाठी ठेवून द्या. याने जिवाणूंचा 99 टक्के नायनाट होतो.

4. काचेचे ग्लास : ग्लासावर पडलेले पाण्याचे डाग घालविण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरमध्ये सम प्रमाणात पाणी घालून काचेच्या ग्लासांवर लावून 15 मिनिटासाठी तसेच ठेवा. याने डाग जातील.

5. शॉवर हेड्स : विविध रोगाचा नायनाट करण्यासाठी शॉवर हेडला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. शॉवर हेडला स्वच्छ करण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरला चांगल्या प्रकारे चोळून एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून रात्र भर लावून ठेवा. याने शॉवर स्वच्छ होईल.