😋 ‘या’ गोष्टींनी वाढते भूक...!


आपल्याला भूक लागलेली असताना आपण एकेकदा असे काही छोटे मोठे पदार्थ खातो त्यामुळे पोट भरण्याऐवजी भूक वाढते. अशाच काही पदर्थांबद्दल माहिती पाहुयात...

1. बंद डब्यातले फळांचे रस हे कृत्रिम फ्लेवर्सपासून बनवलेले असल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे जास्त भूक लागते.

2. बटाट्याचे वेफर्स खातो आणि अधिक भूक लागते. कारण त्यामध्ये असलेले मिठाचे जास्त प्रमाण शरीराला डिहायड्रेट करते.

3. फास्ट फूडमध्ये असणारे ट्रान्स फॅट शरीरामध्ये भूक लागण्याच्या इच्छेला कंट्रोल करणारे न्यूरोट्रान्समिटर्स कमजोर करतात. त्यामुळेच फास्ट फूड खाऊनही भूक लागते.

4. व्हाईट ब्रेड खाल्याने शरीरातील इन्सुलीनचे प्रमाण खूप वाढते. म्हणूनच खूप जास्त भूक लागते.

5. डाएट ड्रिंक्समध्ये कृत्रिम स्वीटनर्सचा वापर केलेला असल्यामुळे काही वेळ एनर्जी वाढते. मात्र थोड्या वेळानंतर जास्त भूक लागते.

6. च्युईंग गममुळे शरिरात गॅस्ट्रीक ज्यूसचे प्रमाण वाढते. त्यामुळे च्युईंग गममुळे अधिक भूक लागते. तसेच व्हाईट पास्ता खाल्ल्यानंतर अधिक भूक लागते.