🧘‍♂️ योगा केल्याने 'हे' फायदे होतात!


🧘‍♀️आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. यानिमित्ताने आपण योगा करण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे पाहुयात...

📌योग तुमचे शरीर आणि मन उर्जावान बनवते. तसेच यामुळे अनेक आजार दूर होतात._

📌नियमित योग केल्यास वाढलेले वजन कमी होते. मात्र, यासाठी आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे._

📌योगाच्या मदतीने बॉडीतील शुगर सहजपणे कंट्रोल करता येते._

📌अस्थमाच्या रूग्णांसाठी योग खुप लाभदायक आहे. कारण याने इन्हेलरचा वापर करण्याची गरज भासत नाही._

📌योगामुळे फफ्फुसांमध्ये ताजी हवा पोहचते आणि श्वास घेण्याच्या सर्व समस्या दूर होतात._

📌हायपरटेंशन सारखा आजार दूर करण्यासाठी योग खुप उपयोगी आहे._

📌योगाच्या मदतीने मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा सहज करता येतो. मायग्रेनमध्ये शीर्षासन किंवा हेडस्टँड केल्याने सुद्धा लाभ मिळतो.

💪जीममध्ये जायला वेळ नाही? मग घरीच करा ‘ही’ सहजसोपी योगासने

👉घरच्या घरी करता येतील अशी सहजसोपी योगासने

👉१. भुजंगासन –

हे मागच्या बाजूने वळत करण्याचे आसन आहे. या आसनामुळे तणाव व थकवा दूर होतो. घरातील काम केल्यानंतर होणाऱ्या पाठदुखीवर भुजंगासन हा रामबाण उपाय आहे. या आसनामुळे पाठीला आराम मिळतो. पोटाच्या बाजूने जमिनीवर झोपा आणि हात जमिनीवर ठेवा. हात कोप-यामध्ये वाकवत छातीच्या बाजूला जमिनीला स्पर्श करत ठेवा. श्वास घेत शरीराचा डोके व मानेपर्यंतचा भाग कमरेपर्यंत वर उचलत वरच्या दिशेने पाहा आणि हे करत असताना पाय एकमेकांना जुळवून ठेवा. ६ सेकंदांपर्यंत या स्थितीमध्ये राहा आणि त्यानंतर हळूहळू मूळ स्थितीमध्ये या.

👉२. सर्वांगासन-

दिवसभर उभं राहून कामं केल्यामुळे शरीराचा संपूर्ण भार पायांवर येतो.त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हा योगप्रकार फायदेशीर आहे. तसंच या आसनामुळे मन देखील स्थिर होते. हे आसन करण्यासाठी प्रथम पाय एकमेकांना जुळवत हात बाजूने ताठ ठेवत पाठीच्या बाजूने झोपा. गुडघे, पाय कमरेच्या भागापर्यंत वाकवा. हाताच्या साहाय्याने कमरेचा भाग धरा आणि श्वास सोडत पाय वरच्या बाजूने उचला. असे करत असताना गुडघे वाकलेल्या स्थितीत म्हणजेच कोनाच्या आकाराप्रमाणे ठेवा. हळूहळू पाय सरळ करा आणि पायाची बोटे वरच्या बाजूने धरा. गुडघा देखील सरळ ठेवा. पाठीच्या कणाला आधार देण्यासाठी हाताचा वापर करा. हनुवटी व तोंडाचा भाग जमीन समांतर सरळ ठेवा. ही स्थिती १० ते १२ सेकंदांपर्यंत ठेवा आणि विरुद्ध क्रिया करत हळूहळू मूळ स्थितीमध्ये या.

👉३. यास्तिकासन –

यास्तिकासन केल्यामुळे शरीरातील सर्व स्नायू ताणले जातात. यात स्नायूंमधील ऊती, तसेच अवयव ताणले जाऊन रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे हे आसन महिलांसाठी फायदेशीर आहे. हे आसन करताना प्रथम पाठीवर झोपा व पाय एकमेकांना जोडून घ्या. त्यानंतर श्वास घेत हात डोक्याच्या बाजूने वर घ्या आणि हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. ज्यामुळे शरीरातील स्नायू ताणले जातील.श्वासोच्छवास करत ५ ते ६ सेकंदांपर्यंत याच स्थितीमध्ये राहा