✍️ करिअर : टेक्निकल रायटर - Technical Writer


हल्ली वाढत्या औद्यागिकी करणाच्या युगात टेक्निकल रायटरला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. टेक्निकल रायटर तांत्रिक सुविधा निर्माण करतो ज्यात तो काम करतो आणि लिहितो.  थोडक्यात सांगायचे तर टेक्निकल राइटिंग किंवा टेक्निकल कम्युनिकेशनचा अर्थ वाचकांना आपले विचार सहज समजावे हा आहे.

🤓 कामाचे स्वरूप काय? :

● विविध अहवाल तयार करणे. ज्याचा वापर की व्यावसायिक/ विशेषज्ञ आपल्या कामात नियमित करतात.
● मैन्युअल्स, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, ऑनलाईन हेल्प फाइल्स तयार करणे.
● आईटी, कंज्युमर प्रॉडक्ट्स, मेडिकल, जर्नल्स, ग्रॉफिकल प्रेझेंटेशन करणे.
● सामान्य लोकांसाठी इंजिनिरिंग तथा डिजाइनिंग बाबत लेखन करण्याचे काम करणे.
● ग्राहकांची गरज लक्षात घेऊन एखादे उत्पादन उपयोग आणण्याच्या कामात मदत करणे.
● तो तज्ज्ञ नसला तरी त्याला उत्पादनाच्या ज्ञानाबरोबर औद्यागिक बाजूचेही चांगले ज्ञान असावे लागते.

🎯 पात्रता काय? : 

● या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिक्षणाची आवश्यकता नाही.
● पत्रकारिता आणि जनसंवादचा पदवी किंवा पदविका धारक तसेच इंग्रजी साहित्य, विज्ञान, आईटीचा पदवीधारक या क्षेत्रात काम करू शकतात.
● या क्षेत्रात काम करताना इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
● या व्यवसायात संगणक साक्षरता आवश्यक आहे.
● काही विद्यापीठांमध्ये जनसंवाद विभागात टेक्निकल राइटिंगचे सर्टिफिकेट कोर्स चलविले जातात
● विदेशातील अनेक संस्थामध्ये टेक्निकल राइटिंगचा डिग्री डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम चालविला जातो. तसेच याबाबत ऑन लाइन अभ्यासक्रमही उपलब्ध आहे.

✔️ कौशल्य : या विद्यार्थ्यांना विशेष ग्राहकवर्गाकडे लक्ष देऊन लेखन करावे लागते. सोप्या, सहज भाषेत आपला संदेश ग्राहकांपर्यंत पोहचावा लागतो. तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य जसे हेडिंग, लिड, ग्रॉफिक्स याचा वापरही करावा लागतो.

💁‍♂️ रोजगाराच्या संधी : 

● जाहीरात संस्था, सॉफ्टवेअर उद्योग, वृत्तपत्रे, मासिके, आयटी उद्योगा क्षेत्रात संधी आहे.
● फ्रिलांसर टेक्निकल रायटर म्हणूनही काम करू शकतात. यांना कामानुसार मोबदला मिळतो.
● इवेल्यूशन आणि फिसिबिलिटी रिपोर्ट, प्राइमरी रिसर्च रिपोर्ट, टेक्निकल बॅक ग्राउंड रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट, बिझनेस प्लान, यूजर्स गाइड सारखी कामेही टेक्निकल रायटर करावी लागतात.
● टीसीएस, इंफोसिस टेक्नॉलॉजीस लिमिटेड, सन माइक्रोसिस्टम्स, इंफोटेक सारख्या भारतीय कंपन्यांमध्ये टेक्निकल रायटर म्हणून अनेक संधी आहेत.



तुम्हाला आवडले ! तर नक्की शेअर करा