💥 काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा


⚡ जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.


💁‍♂️ काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीनगर येथील झदिबल आणि झूनिमर पोझवालपोरा या भागात दहशतवादी लपून बसल्याची खबर सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.

📍 त्यानुसार, सुरक्षा रक्षकांनी येथे शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्याला आपल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

📶 दहशतवादी लपून बसल्याचे उघड झाल्याने श्रीनगर शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे.

👮🏻 तसेच या लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याासाठी सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहीम अद्याप सुरु आहे. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली.