💥 देहूत पार पडले संत तुकाराम महाराजांचे नीरा स्नान


👉 यंदाचा पालखी सोहळा कोरोनाचे सावट मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. त्यामुळे जगतगुरु तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पादुकांचे देहू येथे नीरा स्नान पार पडले.

👉 पुणे जिल्ह्यातून कोळी समाजाच्या होडीने तुकाराम महाराजांची (Sant Tukaram Maharaj) पालखी नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, तेव्हा इथे पादुकांना स्नान घालण्याचा प्रघात आहे.

👉 संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) संस्थानने रात्री जाऊन हंडाभरुन पाणी आणले. देहूमधील इंद्रायणी नदीत हा ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडला. पादुका स्नान सोहळ्यासाठी देहू संस्थानाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.

👉 पादुका घेऊन जाण्यासाठी फुलांच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर पवित्र इंद्रायणी नदीमध्ये आरती आणि विधिवत पूजा करण्यात आली.

👉 मोजक्याच वारकऱ्यासोबत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात देहूनगरी दुमदुमत आहे.