🌦️ मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा


निसर्ग' चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत, पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाईसाठीचा निधी देण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (रविवारी) पुण्यात सांगितले.
 Review of pre-monsoon preparations
कोल्हापूर व सांगली जिल्हयात गतवर्षीची पूरस्थिती विचारात घेवून अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल' मध्ये मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.
Review of pre-monsoon preparations
या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विश्वजित कदम, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई,  पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आयुष प्रसाद, राजेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.

यावेळी  विजय वडेट्टीवार म्हणाले, मान्सूनच्या आगमनापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था विभागाने केल्या आहेत. ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी अधिक दक्षतेने उपाय योजना करणे आवश्यक आहे. मंत्रालयाने पावसाळ्याच्या सुरुवातीला नव्या ११६ बचाव कार्य बोटी उपलब्ध केल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले.