❤️ खरे प्रेम करणाऱ्यांसाठी फक्त Only for true lovers


सगळेजण शाळेच्या संमारभांची तयारी करत होते. कारण खुप वर्षानी सर्वजण एकञ, मिळणार होते पण तो तर खास करुन तिची वाट पाहत होता, कारण तो तिला 15 वर्षानंतर भेटणार होता, पण भीती पण वाटत होती की तिला आमंञण मिळाले असेल का ?? संध्याकाळ झाली सर्व मिञमैञींणी जमा झाले पण ह्याच्या नजरा माञ दरवाज्याजवळच होत्या. कदाचीत देवालाही त्या दोंघाना एकमेकांना मिळवायचे असेल. त्याच दिवशी ती तिच्या घरी येते. कारण तिच्या आईची तब्येत ठीक नसते व म्हणून ती तिच्या नवऱ्यासोबत येते. तेव्हा तिला संमारभ आहे हे समजते. मग तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरुन ती त्या संमारभामध्ये येते..

तिचे नाव निधी.. सर्वात सुदंर दिसत होती व रगांने गोरी असल्यामुळे तर ती अजुनच सुदंर दिसत होती. हा तर तिला पाहतच राहिला व त्याला त्याच्या लहानपणाची आठवण येऊ लागली कसे ते शाळा सुटल्यावर आंब्याच्या झाडाखाली भेटत असे व तिथे दोघे बसून गप्पा मारत असे व गिटार बरोबर गाणी बोलून तिला खुश करत असे. पार्टीची सुरुवात होते हा नेहमीसारखा हातामध्ये गिटार घेऊन...
तुने मेरे जाना कभी नही जाना,
इश्क मेरा दर्द मेरा आशिक तेरा...
भीड में खोया रहेता है.....

अजुनही निधी त्याच्यावरच प्रेम करत असते व ती सुद्धा गायला सुरुवात करते....

अकेले... अकेले...
रेह गयी बिन तेरे यु अकेले...
मै तडपू... या मै तरसू... या चली आऊ में पास तेरे...
इतनी तन्हाई है जिंदगी... खो गयी...
बाते करने सारी... आ रही हु... तुझसे ही...
मेंने मेरे जाना अब है  जाना...
इश्क तेरा दर्द... दर्द तेरा...
तू जो गया... हाल ये मेरा रेहता है...
दिल ये मेरा खुद से ही तन्हा रेहता है...

      त्या राञी दोंघाना ही झोप लागली नाही. ते दोघ दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागले कधी एकमेकांना भेटतात असे झाले होते भेटण्याचे ठिकाण नेहमीचे आंब्याचे झाड. हा अगोदरच तिथेच तिची वाट पाहत होता. निधी माञ घरातुन खोटे बोलून आली होती.
ती, "कसा आहेस ?
तो, "मी आहे गं व तु येणार या आशेवरच अजून जगत आहे. ते जाऊ दे तुझा नवरा कसा आहे आणि तु खुश तर आहेस ना ?

ती, "खुप प्रेम करतो रे तो माझ्यावर व मी पण करते पण काय माहिती मनामध्ये फक्त तुझाच विचार येतो रे... खुप प्रयत्न केला तुला विसरण्याचा, पण नाही जमले मला.. खुप उशीर विचार केल्यानतंर दोघे ही घरातून पळुन जाण्याचा विचार करतात.. पळून जाण्याचा दिवस ठरला. तो गाडी घेऊन तिची वाट पाहत होता. निघताना माञ तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की मी आता तुझ्याबरोबर राहू शकत नाही, कारण माझे पहिले प्रेम मी नाही विसरु शकतं...

नवरा, "मला माहित होते की हे असे होणार, कारण पार्टीच्यावेळी तु त्याच्याकडे ज्या नजरेने पाहत होतीस तेव्हा मला कळाले व नतंर तुझ्या मित्रमैत्रीणींकडून समजले. पण मी विचार केला की तो तर तुझा PAST होता व मी PRESENT मध्ये जगणारा माणूस आहे. मला वाटले की या दिवसामध्ये मी तुला इतके प्रेम देईल की, तुला त्याची आठवणच येणार नाही. माझे अश्रु पापण्याच्या आड लपवून तुला नेहमीच सुख देण्याचे मी ठरवले होते. खरे म्हटले आहे प्रेमापेक्षा मैञी श्रेष्ठ असते जा गं जा तु खरचं जा Please आणि खुप खूश रहा तिथे,
अमर तिची वाट पाहत होता ती येताच तिला Are You Ok. असं म्हणाला..
ती, “Yes fine.

गाडीमध्ये बसल्यावर तिला अचानक तिच्या नवऱ्यासोबत जे काही क्षण घालवले ते आठवले आणि ती रडु लागली व तिने त्याला सांगितले की Please Stop The Car.. मला माझ्या घरी परत सोड कारण मी माझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत..

अमर तिला घेऊन गेला व नवऱ्याला पाहताच तिने त्याला मिठी मारली व त्याच्या मिठीमध्ये ती रडु लागली अमर माञ रडतच राहिला, त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज होती तो घरी जातो. समोर त्याला त्याची आई दिसते. तो त्याच्या आईला मिठी मारतो आणि रडत रडत आईला म्हणतो, माझे पहिले प्रेम अपुर्ण राहिले मी नाही समजावू शकलो तिला... आई पण मी खुप खुश आहे. कारण तिला खरंच खुप चांगला जीवनसाथी मिळाला आहे आणि तो तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो आई.