😱 देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखांच्या जवळ


Corona Live

⚡ देशावर कोरोनाचे पडलेले काळे सावट सध्या आणखीनच गडद होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

⏰ कारण देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मागील 24 तासात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे.

😷 काल दिवसभरात देशात सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चार लाख 90 हजार 401 वर पोहचला आहे.

😰 त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्युची संख्या देखील वाढली आहे. दरम्यान, देशातील मृतांची संख्याही 15 हजारांच्या पुढे पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

📌 कोरोनाबाधितांची संख्या 14 हजारांहून अधिक वाढण्याचा हा सलग सातवा दिवस होता.