💥 मोदी सरकारच्या निर्णयाची माहिती पञक घरोघरी वाटणार

   
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला वर्षपूर्ती झाली. केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठक घेऊन घरोघरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहलेले पत्र वाटून माहीत देणार आहे.

 बुथ कार्यकर्ते यांची बैठक घेऊन व्हॉटसप ग्रुप बनविण्यात येणार आहे.  अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी दिली.

येथील भाजप तालुका कार्यकारिणी बैठक घेण्यात आली यावेळी अरूण मुंढे बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुंढे म्हणाले, प्रत्येक बुथवर किमान शंभर घरी संपर्क करण्याची योजना शक्तीकेंद्र बुथ अध्यक्षांनी करावी, एका वेळी दोन पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी एका घरी संपर्कासाठी जाऊ नये,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरात ७० वर्षापासून रखडलेला ३७० कलम, नागरीकत्व सुधारणा कायदा, राममंदिर उभारणी, ट्रिपल तलाक असे धाडसी निर्णय घेतले आहेत याची माहिती जनतेला व्हावे यादृष्टीने बैठका घेतल्या जात आहेत.

देशात महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची सर्वात मोठी असून राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यास हाताबाहेर ठरली आहे स्थगिती सरकार अनेक पातळीवर अपयशी ठरले असून त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडत आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, पंचायत समिती सभापती रवींद्र सुरवसे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रविण सानप,

जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, बापूराव ढवळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, अमित चिंतामणी, बिभिषण धनवडे,

मनोज कुलकर्णी, पांडुरंग उबाळे, केशव वनवे, शरद कार्ले, संजय कार्ले, लहू शिंदे, उध्दव हुलगुंडे, संजय गोपाळघरे, गणेश लटके, सुनिल यादव आदी उपस्थित होते.
           
 नगराध्यक्ष निखिल घायतडक व राजीनामा देणारे दहा नगरसेवकांनी राजीनामा देणार आहे असे विचारले असता याबाबत माजी मंत्री राम शिंदेच उत्तर देऊ शकतील तसेच त्यांची गैरहजेरी ही सोशल डिस्टन्सिंगमुळे ठरावीक लोकांनाच बोलावले होते.

 माजी मंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर निधी आणला आहे तेच कामे चालु असून प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी त्याचे उदघाटन करावे असे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी सांगितले.