💥 बिबवेवाडी परिसरात रखवालदाराचा खून


पुण्याच्या कोंढवा परिसरात एका रखवालदाराचा खून करण्यात आला आहे. आज (शनिवारी) दुपारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात  अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पत्ते खेळण्याच्या वादातून हा खुन झाल्याची माहिती समोर येत  आहे. प्रकाश खाजाप्पा खाणेकर (३४, रा.मुळ दुधणी, अक्कलकोट, जि.सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,प्रकाश खाणेकर हे दिवसा बिगारी काम करुन रात्री तेथे रखवालदारी करतो.

शनिवारी दुपारी तो काही ओळखीच्या लोकांसमवेत मोकळ्या प्लॉटमधील रहात्या शेडमध्ये पत्ते खेळत होता.

खेळताना त्यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा प्रकार घडला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. व त्यातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांना माहिती समजताच घटनास्थळी दाखल झाले. प्रकाश त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत