🎬 सुशांतच्या जीवनावर येणार सिनेमा!


फिल्म निर्माते विजय शेखर गुप्ता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर 'आत्महत्या या हत्या' नावाचा सिनेमा तयार करणार आहे.

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली. ते म्हणाले, 'फिल्म इंडस्ट्रीतील बडे स्टार्स आणि प्रॉडक्शन हाऊसचा एकाधिकार संवपण्यासाठी हा सिनेमा तयार करत आहोत.
 Movies will come on Sushant's life!
सध्या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले असून या सिनेमातून बॉलिवूडचा मुखवटा उतरवायचा आहे असेही त्यांनी सांगितले.

🗣️ विजय शेखर गुप्ता म्हणाले :

● सुशांतला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करण्यात आले आहे.
● कारण त्याला बॅन करण्यात आले होते. अनेक सिनेमातून त्याला काढण्यात आले होते.
● हे सर्व काही आत्महत्या या हत्या या सिनेमात दाखवल्या जाणार आहेत.
● हा एका बायोपिक नसेल परंतु सुशांतच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असेल.