💥 कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू!


⚡ कोरोनामुळे द्रमुकचे आमदार जे. अन्बझागन यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर आठवडयाभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ते 61 वर्षांचे होते. कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू होण्याची देशातील ही पहिली घटना आहे.

💁🏻‍♂️ किडनीचा त्रास : जे. अन्बझागन यांना ठेवलेल्या रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. मात्र मंगळवारी रुग्णालयाने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जाहीर केले. त्यांना पूर्वीपासून किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली.

🧐 सक्रिय : कोरोनाच्या या संकटकाळात राज्यातील जनतेला मदत करण्यामध्ये जे. अन्बझागन मोठया प्रमाणावर सक्रिय होते. ते चेन्नई पश्चिमचे द्रमुकचे सरचिटणीसही होते.

📌 मागच्या मंगळवारी त्यांनी ताप, सर्दी आणि श्वासोश्वास करताना त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.