💥 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाउन


⚡ ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

💁‍♂️ येथे लॉकडाऊन : ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

👀 हॉटस्पॉट भागासाठी : नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात हॉटस्पॉट आहे, त्या भागासाठी हा निर्णय घेतला आहे.

🙏 बळी पडू नका : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ठाकरे म्हणाले की, राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाविरोधात आपल्याला अजून लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका, असे म्हणत लॉकडाउन उठवणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

📌 कठोर लॉकडाउन : ज्या भागात कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशा भागात कठोर लॉकडाउन लागू करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकाने आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.