🥃 दारुड्यांसाठी खुशखबर, स्पेशल कोरोना टॅक्स हटवला


केजरीवाल सरकारने आता सर्व दारूच्या ब्रँडवर लावण्यात आलेली विशेष कोरोना फी मागे घेतली आहे.
[Good news for alcoholics, Special Corona tax removed]
👉 लॉकडाऊन दरम्यान राज्य सरकाराला काही महसूल मिळावा यासाठी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. यावरून देखील संमिश्र अश्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.

👉 मद्य विक्रीसाठी केंद्राने परवानगी दिल्यावर काही राज्यांनी दारुवर स्पेशल कोरोना टॅक्स लावला होता यावरून काहीशी नाराजी मद्यप्रेमी लोकांमध्ये पाहायला मिळाली होती.

👉 अशाप्रकारचा टॅक्स लावणारं दिल्ली हे देशातील पहिलं राज्य होतं. आता याच दिल्लीमध्ये मात्र मद्य स्वस्त होणार आहे.

👉 दिल्ली सरकारने सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या किंमतीवर 70 टक्क्यांपर्यंत स्पेशल कोरोना फी लावली होती. त्यामुळे राजधानीत दारूचे दर वाढले होते.

👉 दिल्लीत दारु प्रचंड महागल्याने दारु विक्री सातत्याने कमी होत होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली सरकारने स्पेशल कोरोना टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.