💥 राज्य पहिल्या क्रमांकाचे कसे होईल हेच ध्येय


💫 आपल्या एकट्याचे यश नसून राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश असल्याची भावना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
The goal is to make the state number one

💁‍♂️ ठाकरे म्हणाले :

▪️ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला हे माझे एकट्याचे यश नसून सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे.
▪️ मुख्यमंत्रीपद निमित्त असून महाराष्ट्राची सेवा घडत असल्याचे महत्त्वाचे आहे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.
▪️ महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला. माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार.
📌 दरम्यान, अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नसल्याची भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.