💥 G7 मध्ये सहभागी होण्यावरुन चीनचा भारताला इशारा


[China warns India to join G7]
⚡ आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना असलेल्या G7 मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणारा भारत आगीशी खेळत असल्याचा धमकी वजा इशारा चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखामधून दिला आहे.

💁🏻‍♂️ अमेरिकेचा मनसुबा : सदर लेखामधून चीनने भारताला या संमेलनामध्ये सहभागी करुन घेण्यामागे अमेरिकेचा वेगळाच हेतू असल्याचे म्हटले आहे. भारताचा समावेश करुन घेत हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामधील आपली ताकद वाढवण्याचा अमेरिकेचा मनसुबा असून चीनची कोंडी करण्यासाठी हा डाव असल्याचे लेखात म्हटले आहे.

👀 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये 2 जूनला रात्री फोनवरुन चर्चा झाली. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण दिले.

📌 डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 देशांच्या संघटनेचा विस्तार करायची इच्छा व्यक्त केली असून त्या दृष्टीने ट्रम्प यांनी भारताला निमंत्रीत करण्याचे हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. भारतानेही या निमंत्रणावर सकारात्कम प्रतिसाद दिला आहे. याचाच संदर्भ देत भारताला इशारा दिला आहे.