💥 तबलिगी जमातच्या परदेशी सदस्यांना भारतात प्रवेश बंदी

Foreign members of Tablighi community banned from entering India

⚡ दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या 2550 परदेशी सदस्यांना काळ्या यादीत टाकले आहे. या सर्वांवर 10 वर्षांसाठी भारतात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीदेखील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत मार्च महिन्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.
काळ्या यादीत : एकूण आठ हजार लोक या तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थितांपैकी अनेकजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. जे पर्यटक व्हिसावर आले होते व तरीही निझामुद्दीन येथील कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.
📌 परदेशी : ज्यांना काळ्या यादीत टाकले आहेत, ते आता पुन्हा भारतात येऊ शकणार नाहीत. पोलिसांनी यापूर्वी कारवाई केल्यानंतर माहिती देताना एकूण 281 परदेशी नागरिक हे निझामुद्दीन परिसरात दोन दिवस उपस्थित होते अशी माहिती दिली होती. त्यात नेपाळ 19, मलेशिया 20, अफगाणिस्तान 1, म्यानमार 33, अल्जेरिया 1, दिजबौती 1, किर्गिझस्तान 28, इंडोनेशिया 72, थायलंड 7, श्रीलंका 72, बांगलादेश 19, इंग्लंड 3, सिंगापूर 1, फिजी 4, फ्रान्स 1, कुवेत 1 याप्रमाणे नागरिक उपस्थित होते. हे सर्व परदेशी लोक पर्यटक व्हिसावर आले व धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.