💥 जबरदस्तीने कापला फीचा पहिला हप्ता


👉 शहरातील आकुर्डी, गंगानगर येथील न्यू पुणे पब्लिक स्कूलने पालकांकडून बळजबरीने शालेय फीचा पहिला हफ्ता कापून घेतला असल्याचा प्रकार समोर आला आहे.

👉 त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले. मात्र, याबाबत शाळा व्यवस्थापनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

👉 राज्य सरकारच्या आदेशानुसार, जोपर्यंत शाळा सुरु होत नाही तोपर्यंत फी घेण्यात येवून नये असे आदेश असताना देखील या शाळेने सरकारच्या कोणत्याही आदेशाचे शाळा व्यवस्थापनाने पालन न करता जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पहिला हफ्ता भरण्यासाठी एसएमएस पाठविला. तसेच पालकांनी हफ्ता जमा न केल्यास दंड आकाराला जाईल असेही सांगण्यात आले.

👉 कोरोनामुळे ८० टक्के पालकांचे तीन महिन्यापासून पगार नाहीत. तरीदेखील शाळेकडून बळजबरीने हफ्ता कापून घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

👉 कोरोनामुळे सर्व पालकांचे रोजगार व व्यवसाय डबघाईला आले आहेत. अशा परिस्थितीत शाळेने पालकांचा कापण्यात आलेला पहिला हफ्ता त्वरित जमा करावा, अशी मागणी पालकांनी यावेळी केली. याबाबत संस्थाचालक प्रदीप खंदारे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.