💥 भारताला धोका संसर्ग विस्फोटाचा!


⚡ भारतात आतापर्यंत कोविड 19 संसर्गाचा विस्फोट झाला नसला तरी तो होण्याची जोखीम कायम आहे.  कारण टाळेबंदी उठवल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

💁🏻‍♂️ परिणाम वेगवेगळा : जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन आरोग्य कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग भारतात आता तीन आठवडे आहे. याचा अर्थ ही वाढ घातांकी नसली तरी ती कमी झाली नाही. भारताच्या वेगवेगळ्या भागात कोविड 19 साथीचा परिणाम वेगवेगळा आहे.

👀 शक्यता : ग्रामीण भाग व शहरी भाग यातही फरक दिसतो. दक्षिण आशियात भारतच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान यासह इतर देशात लोकसंख्येची घनता जास्त आहे. अजून तरी कोविड 19 संसर्गाचा विस्फोट झालेला नाही, पण तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💫 टाळेबंदीमुळे भारतातील संसर्ग मर्यादित राहिला हे खरे असले तरी टाळेबंदी उठवल्यानंतर तो आता वाढू शकतो. मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर, लोकसंख्येची वाढती घनता, असे अनेक  प्रश्न भारतात आहेत. त्यातही स्थलांतरित लोकांना घरी बसूनही चालणार नाही. भारत सध्या कोविड संसर्गात सहाव्या क्रमांकावर गेला आहे.

🗣️ जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले : भारतात दोन लाख रुग्ण असले तरी देशाची लोकसंख्या 1.3 अब्ज आहे, त्यामुळे रुग्णांचा आकडा फार जास्त म्हणता येणार नाही. रुग्ण वाढीवर नजर ठेवणे गरजेचे असून ती वाढता कामा नये.

📌 टाळेबंदी उठवल्यानंतर नियमांचे पालन करावेच लागणार आहे. त्यासाठी लोकांच्या वर्तनात बदल करावा लागेल. शहरांमध्ये सामाजिक अंतर राखणे काही ठिकाणी कठीण आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले पाहिजेत.