💥 आरटीई प्रवेश प्रक्रियेचा खुलासा करा


आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कारण काही सीबीएसई शाळांनी आपले ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
[Explain the RTE admission process]
त्यामुळे या शाळांमधील आरटीईचे प्रवेश अधांतरी राहिले आहेत. या संदर्भात शिक्षण खात्याने आपले पुढील धोरण जाहीर करुन आरटीई प्रवेश प्रक्रियेचा खुलासा करावा, अशी मागणी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेने केली आहे.

याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार असलेल्या २५  टक्के आरक्षणाची प्रवेशाची सोडत मार्चमध्ये काढण्यात आली.

यामध्ये काही पालकांना मेसेज केले काहींना नाही. त्यात लगेच लॉकडाऊन सुरु झाले. आज सर्वच प्रक्रिया ठप्प झाली आहे. शाळांना खुल्या वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे.

तर वंचित घटकांची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे प्रक्रियेचा खुलासा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.