✍️ ड्रॅगन तोंडघशी


पूर्व लडाखमधील गलवान खो-यात भारताने चिनी सैन्यावर हल्ला केला, असा कांगावा करून भारताला जगात एकाकी पाडण्याचा चीनचा प्रयत्न होता; परंतु भारताने तो उधळून लावला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा कट पूर्वनियोजित होता, असे स्पष्टपणे सांगितले. त्याचे पुरावेही आता हळूहळू पुढे येत आहेत. दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार शस्त्रे चालवायची नाहीत; परंतु  तरीही चिनीसैन्याने लोखंडी गजाने भारतीय जवानांवर हल्ला केला. Of Chinese Army जवळही ही हत्यारे कायम असतात, हे गेल्या दोन दिवसांपूर्वीच उघड झाले होते. आता तर चिनी माध्यमांनीच केलेल्या गाैप्यस्फोटामुळे चीन तोंडावर आपटला आहे.

चीनने 15 जून रोजी गलवान खो-यातील चकमकीच्या आधी आपल्या सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी मार्शल आर्टिस्ट आणि तज्ज्ञ पर्वतारोहक पाठविले होते. यात तिबेटमधील मार्शल आर्ट क्लबमधील सैनिकांचा समावेश होता. चीनच्या सरकारी माध्यमांनी आपल्या अहवालात असे म्हटले आहे, की चिनी सैनिकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी अगोदरच पावले उचलली होती. Chine चे अधिकृत सैन्य वृत्तपत्र 'China National Defense News' च्या News Paper नुसार, चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये पाच लष्करी विभाग तैनात केले. यामध्ये माउंट एव्हरेस्ट टॉर्च रिले टीमचे माजी सदस्य आणि मार्शल आर्ट क्लब सेनानींचा समावेश होता.

Mount Everest Torch Relay टीमचे सदस्य पर्वतीय भागात लष्करी कारवाई करण्यात तरबेज असतात. त्यांच्या हालचाली गतिमान असतात. Martial artist धोकादायक सैनिक असतात. जवानांना चपळ आणि प्रशिक्षित बनवण्यासाठी त्यांना तैनात केले होते. मिलिशिया विभाग हा अधिकृत सैन्य विभाग नाही. त्याचा उल्लेख फाईट क्लब  असा केला जातो. त्यांना लडाखमध्ये पाठविल्याने सैन्यांची संख्या आणि वेगाने प्रतिकार करण्याची क्षमता वाढली. केवळ सध्याच्या तणावामुळेच है सैन्य तैनात करण्यात आल्याची माहिती अद्याप मिळाली नाही. गलवान खो-यात संघर्ष झाल्यापासून Chini माध्यमे लष्करी कवायतीच्या बातम्या मोठया संख्येने प्रकाशित करीत आहेत.

सैन्याची जमवाजमव, लष्कर सिद्धता, नवे तंत्रज्ञान आदींची माहिती त्यात असते. तिबेटमधील चिनी सैन्याचे सराव माध्यमांमध्ये आक्रमक पद्धतीने दाखवले जात आहेत. 1996 आणि 2005 च्या करारामुळे सैनिक शस्त्रे वापरू शकत नव्हते. हे चीनला माहीत असल्यानेच त्याने आपल्या सैनिकांना मार्शल आर्टसद्वारे प्रशिक्षण दिले. सध्या चिनी लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) फिरतात. चीनमधील या हालचाली नियंत्रण रेषेच्या दहा किलोमीटर परिसरात सुरू आहेत. अशा परिस्थितीत भारताने आता पीपल्स लिबरेशन आर्मीला (PLA) आपल्या भाषेत उत्तर देण्याची तयारी दर्शविली आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएसीवर चीनच्या लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा मागोवा घेण्यासाठी सैन्याने पूर्वेकडील लडाखमध्ये 'आकाश' Advance हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला चीनच्या प्रत्येक गोष्टीवर सहज नजर ठेवता येते. अशा परिस्थितीत चिनी विमानाने एलएसी ओलांडली, तर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा त्वरित नष्ट करेल. त्यामुळे चीननेही केवळ जमवाजमव करून दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.