🧘‍♀️ योगासने करताय? मग 'हि' काळजी घ्या!


योगासने करताना काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथ्या त्याच्या फायदा होण्याऐवजी तोटा होईल. असे होऊ नये म्हणून तुम्हाला खालील गोष्टी मदत करतील...   

Yogasan kartana ghya ya kalji in marathi

1. सुरुवातीला सोपी योगासने (Yogasan) करा. कारण कठीण योगा कराल तर त्रास होईल आणि थकवा येईल.

2. योगा करण्यापूर्वी थोडा वॉर्मअप, प्राणायाम आणि मग योगा करा. तसेच अखेरीस शवासन नक्की करा.

3. योगासने नेहमी स्वच्छ आणि मोकळ्या जागेत करा. त्यामुळे शरीराला ताजी हवा मिळेल.

4. फक्त पुस्तकांमध्ये वाचून किंवा सीडी वगैरे बघून योगासने करू नका.

5. अंगावर असणाऱ्या वस्तूंमुळे योगासनांच्या वेळी अंगाला इजा होण्याचाही संभव जास्त आहे. म्हणून त्या काढून ठेवा.

6. योगासने करताना नवीन आसनं करण्यापूर्वी ट्रेनरचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल.

7. योगा केल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे लगेच थंडगार पाणी प्यायल्याने सर्दी-खोकला, ऍलर्जी किंवा कफासारखे विकार बळावू शकतात. याचा विचार करा.

8. आजारी असाल तर योगासने करणे टाळा. तरीही योगा करायचा असेल तर ट्रेनरचा सल्ला घ्या.