💥 संरक्षण सचिव अजय कुमार यांना कोरोनाची लागण


⚡ भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांचा कोरोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. अजय कुमार यांना सौम्य ताप आला होता व त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली. मंगळवारी त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
Defense Secretary Ajay Kumar infected with corona
💁🏻‍♂️ कोरोनाची बाधा झालेले सरकारमधील ते पहिले वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य वरिष्ठ नोकरशहा, लष्करी अधिकारी आणि मंत्री यांची कोरोना चाचणी झाली का? ते अजून स्पष्ट झाले नाही.
😷  रायसीना हिल्स येथे साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय आहे. अजय कुमार यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर 35 अधिकारी होम क्वारंटाइन झाल्याचे म्हटले आहे.
📌 संरक्षण मंत्रालयाने अजय कुमार यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु केला आहे. साऊथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्याचे निर्जतुकींकरण केले आहे.