🗽 अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना


⚡ अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे.

💁‍♂️ जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली.
🏛️ वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे.
🔎 युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
📍 जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.