💥 पालघर लिंचिंगमधील ११ आरोपींना कोरोना


💫 पालघर लिंचिंगमधील अटक असलेल्या ११ आरोपींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले असून वाडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

✨ पालघरमधील गडचिंचले गावातील २३ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.

👉 ११ आरोपींचा कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर वाडा पोलीस ठाणे तसेच शेजारी असलेले तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

📍 यामधील ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून ६ आरोपींचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.

📌 दरम्यान, या आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.