शहरातील विप्रनगर येथे कन्टेनमेंट झोन घोषित


👉 शहरातील विप्रनगर येथील कोरोना विषाणूची लागण (COVID-19 Positive) झालेले  रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

👉 कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

👉 विप्रनगर येथील  रुग्णास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे असे औरंगाबाद  येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल (Dr. Hedgewar Hospital) यांनी कळविले आहे.

👉 त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील विप्रनगर येथील श्रीकिसन जेथलिया यांच्या घरापासून ते ज्ञानोबा माऊली मुंडे यांचे घरापर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .