संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका पंढरपूरला रवाना Chalapaduka of Saint Shrestha Dnyaneshwar Maharaj left for Pandharpur


👉 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुकांचे पंढरपूरकडे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत एसटीने रवाना झाल्या.

👉  सतरा दिवसांचा आजोळचा मुक्काम हलवून आज मंगळवारी दुपारी सव्वा एकाच्या सुमारास  देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील, विश्वस्त, सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींच्या पादुका हरिनामाचा गजरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या.

👉  त्यांनी एस.टी.बसपर्यंत चालत जात पादुका मोजक्या वीस लोकांच्या समवेत हरिनाम, टाळ - मृदुंगाच्या गजरात एस.टी. महामंडळाच्या विठाई बसचे स्वरूप असलेल्या एस.टी.बसमध्ये विराजमान केल्या.बसवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली.

👉 माऊली - माऊलींच्या गजराने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी प्रांताधिकारी संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, सोहळा प्रमुख योगेश देसाई, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब चोपदार, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, अशोक कांबळे, राहुल चिताळकर व मानकरी,वारकरी,भाविक उपस्थित होते.

👉 मंगळवारी पहाटे माउलींच्या पादुकांवर पवमान पूजा व दुधारती झाल्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा वाजता महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ करण्याच्या विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होते.