💥 पुणे जिल्ह्यातील कोंढवे धाडवे गाव घालणार चिनी वस्तूंवर बहिष्कार


👉 जिल्ह्यातील कोंढवे धाडवे या ग्राम पंचायतीने चिनी (Boycott China)वस्तूंच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Boycott China
👉 १ जुलै २०२० पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामपंचायतीकडून त्यासाठी एक पत्रकच जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती सरपंच नितीन धावडे यांनी दिली आहे.

👉 (Boycott China) याबाबत सरपंचांनी सांगितले की,  आम्ही ग्रामपंचायतीच्या ठेकेदारांना सुद्धा या निर्णयाबाबत सांगितले आहे. आम्ही दुकानदार आणि ग्रामस्थांनाही चीनी वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर प्रतिबंध लावण्यास सांगितले आहे.

👉 याच्या अंमलबजावणीसाठी पोस्टर लावण्यात येणार आहेत. असा चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणारे आमचे गाव हे राज्यातील पहिले गाव ठरणार  आहे.

👉 सध्या भारत- चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाचे वातावरण हे या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या लढाईत आपल्या भारताचे वीस सैनिकांना वीर मरण प्राप्त झाले आहे.