💥 बीड ब्रेकिंग न्युज: बँक शाखा व्यवस्थापकाच्या तोंडास काळे फासण्याचा इशारा


शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांनी पिक कर्ज देताना फेरफारची नक्कल मागू नये असे जिल्हाधिका-यांचे आदेश असतानाही या आदेशाची पायमल्ली करत बँका कडून सर्रास फेरफार नकले साठी अडवणूक केली जात आहे. हे तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ द्यावे अशी मागणी करत नसता बँक शाखा व्यवस्थापकाच्या तोंडास काळे फासण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खामकर व सुधीर शिनगारे यांनी किल्लेधारुर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

राष्ट्रीयकृत बँकाकडून पिक कर्ज देताना शेतकऱ्यांना फेरफार नकलेची मागणी कोरोना काळात करू नये. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढूनही राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांची अडवणूक करून पिक कर्जासाठी फेरफारची नकलेची मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याने शेतकरी तहसील कार्यालयात फेरफार नकले साठी गर्दी करत आहेत. यामुळे सर्व सोशल डिस्टंसिंगचा बोजबारा वाजत आहे. यामुळे परिस्थिती व शेतकऱ्यां समोर संकट असताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक तात्काळ थांबवावी.

बँकाना तात्काळ सुचना करून त्यांचे वर कडक कारवाई करावी नसता या बँक शाखा व्यवस्थापकाच्या तोंडास काळे फासले जाईल असा इशारा निवेदना द्वारे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खामकर व सुधीर शिनगारे यांनी दिला आहे.