💥 लोणावळ्याजवळ शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात


राष्ट्रवादीचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाचा Lonavala जवळ अपघात झाला आहे. या अपघातात Police कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

Mumbai- Pune  द्रुतगती मार्गावर असणाऱ्या बोरघाटात Sharad Pawar यांच्या पोलिसांच्या ताफ्यातील एक वाहन उलटल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलातील विशेष पथकातील अधिकारी किरकोळ जखमी झाला.

सोमवारी (दि.२९) रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. खंडाळा घाटातील बोगदा संपल्यावर Mumbai कडे जाण्यासाठी तीव्र उतार आहे.

या उताराचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला जाऊन धडकले. व वाहन पलटी झाले आहे. यात विशेष पथकातील पोलीस निरीक्षक किरकोळ जखमी झाले. त्यानंतर Sharad Pawar यांचा ताफा मुंबई कडे रवाना झाला.