😱 81 देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट


⚡ जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली नसताना 81 देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

👉 दक्षिण आशिया, मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकन देशांमधील परिस्थिती आणखी चिंताजनक होणार असल्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

😷 आफ्रिकन देशांमध्ये तीन महिन्यांत एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले होते. मात्र, मागील १९ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पटीने झाली आहे.

💫 दक्षिण आफ्रिकेत दररोज एक हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

📝 ३६ देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 89 लाखांहून अधिक झाली आहे.

📍 त्यापैकी 4 लाख 67 हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, 47 लाखांहून अधिकजणांनी कोरोनावर मात केली असल्याचे एका संकेतस्थळाने नमूद केले आहे.