💥 80 कोटी भारतीयांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य


💥 देशभरातील 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याची Prime Minister Narendra Modi  यांनी देशाला संबोधित करताना घोषणा केली आहे.

💁‍♂️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे :

▪️ देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत लागू.

▪️ 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ,1 किलो हरभरा दाळ मोफत.

▪️ अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच पट जनतेला सरकारकडून मोफत अन्नधान्य.

▪️ मागील तीन महिन्यात 20 कोटी जनतेला 31 हजार कोटी रुपये, 9 कोटी शेतकऱ्यांना 18 हजार कोटी रुपये खात्यात जमा.

▪️ मजुरांच्या रोजगारासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च केले.

▪️ एकही गरीब कुटुंबाच्या घरात चूल पेटली नाही, अशी वेळ लॉकडाऊनच्या काळात येऊ दिली नाही.

▪️ पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पावणे दोन लाख कोटी रुपयांचे पॅकेज.

▪️ देशाचा पंतप्रधान असो किंवा सरपंच हा नियमांपेक्षा मोठा नाही, सर्वांनी नियमांचे पालन करावे.

▪️ अनलॉक काळात जास्त खबरदारी घेणे आवश्यक, जे लोक नियम पाळत नाही, त्यांना वारंवार सांगावं लागेल.

▪️ लॉकडाऊनदरम्यान अनेकांनी सतर्कता दाखवली होती, मात्र आता काही जण नियमांचे पालन करत नाही

▪️ वेळेवर केलेल्या लॉकडाऊनने लाखोंचे जीव वाचले. अनलॉक 1 नंतर बेजबाबदारपणा वाढला.

▪️ अनलॉकनंतर वैयक्तिक खबरदारीत बेजबाबदारपणा दिसतो आहे, लॉकडाऊनमध्ये असलेली सतर्कता आत्ता दिसत नाही, हे चिंताजनक.

▪️ आपण अनलॉक 2 मध्ये प्रवेश करत असून सर्दी, खोकल्याचे दिवस असणारा हा हंगाम आहे, त्यामुळे सर्व देशवासियांनी काळजी घ्यावी.

▪️ इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी. आपला मृत्यूदर तुलनेने कमी आहे.