💥 बीडमध्ये आता फक्त 6 कोरोनाबाधित रुग्ण 75 जणांच्या अहवालाकडे लक्ष [ बीड बातम्या ]


बीड जिल्ह्यात 62 जणांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत उपचारानंतर 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी आणखी चार जणांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. त्यामुळे आता फक्त सहा कोरोनाबाधित बीडमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, तब्बल 75 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातून आतापर्यंत 52 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. रविवारी आणखी चार जणांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. त्यामुळे आता केवळ सहा रुग्णावर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एक आणि शनिवारी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका रुग्णांने माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यामुळे माजलगाव येथील संभाव्य धोका टाळण्यासाठी 32 जणांना क्वारंटईन करण्यात आले आहे.

तर परळी येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कात आल्याने तेथील काही नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. रविवारी 75 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आता या अहवालकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.