🌎 5 जून रोजीच का साजरा केला जातो पर्यावरण दिन?


💁‍♂️ दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.

👍 पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश होय.
 Why is Environment Day celebrated only on 5th June?
🧐 पर्यावरणाच्या संवर्धनात अधिकाअधिक देशांनी सहभागी व्हावं यासाठी 1987 पासून दरवर्षी एकएक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशाकडे जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात येतं.
यंदाचे यजमानपद : 2018 च्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे होतं. तर यंदाचे यजमानपद कोलंबिया आणि जर्मनी या दोन देशांनी संयुक्तपणे भूषवलं आहे.
😍 यंदाची थीम : जैवविविधता ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे.

🤔 Environment या शब्दाचा इतिहास :

👉 पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द ‘Environ’ या शब्दापासून तयार झाला आहे. ‘Environ’ म्हणजे ‘Surrounding or encircle’. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

🤔 पर्यावरण दिनाची सुरुवात कशी झाली? :

● पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. बदलत्या हवामानाचे परिणाम हळूहळू जगाला जाणवू लागले होते.
● पर्यावरण संरक्षणासाठी 5 जून 1972 या दिवशी स्टॉकहोम येथे बदलत्या वातावरणाची दखल घेत काही देशांची मंडळी एकत्र जमली.

● बदलते हवामान आणि पर्यावरण याची दखल घेण्यासाठी ही परिषद आयोजीत करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1974 पासून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.