😱 जळगावमध्ये 44 नवे कोरोना बाधित रुग्ण
Corona Live Update
[44 new corona infected patients in Jalgaon]
⚡ जळगाव जिल्हा प्रशासनाला आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 44 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1001 इतकी झाली आहे.😷 जिल्ह्यातील जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, चोपडा आणि रावेर शहरात दररोज मोठ्या संख्येने नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
👉 जिल्हा प्रशासनाला शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 5, भुसावळ 5, अमळनेर 10, चोपडा 9, धरणगाव 4, एरंडोल 1, जामनेर 2, रावेर 6, चाळीसगाव 2 अशा एकूण 44 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
💫 जिल्ह्यातील रावेर शहरात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. येथील रुग्णसंख्येची वाटचाल देखील शतकाच्या दिशेने सुरू आहे. सद्यस्थितीत रावेरात कोरोनाचे 75 रुग्ण आहेत.
टिप्पणी पोस्ट करा