💥 जिल्हा कारागृहातील 43 आरोपींना तात्पुरता जामीन {Beed Reporter}


👉 कोरोनाच्या अनुषंगाने तुरुंगातील गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेले 274 आरोपींना 42 दिवसांच्या तात्पुरत्या जामीनावर सोडण्यासाठी मोफत वकील जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, देण्यात आला. 

👉 प्रमुख जिल्हा न्यायाधीश हेमंत शं. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून त्यांचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात आले व 43 आरोपींना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला.

👉 सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर व अन्य आवश्यक उपाययोजना करणे कठीण होत होते. तसेच कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भीती होती.

👉 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाने समिती स्थापन करून गंभीर गुन्हे वगळता इतर आरोपींना तात्पुरता जामीन देण्याच्या अनुषंगाने सूचित केेले होते.

👉 त्या अनुषंगाने जवळपास 274 आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने अर्ज मागवून ते संबंधीत न्यायालयात दाखल करण्यात आले व 43 आरोपींना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात आले आहे.

👉 या कामी वकील वर्ग, तुरुंगाधिकारी व न्यायाधीश वर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अशी माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव शरद जी. देशपांडे यांनी दिली आहे.