💫 दगडूशेठ गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच


पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरही 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
{Dagdusheth Ganpati temple closed till June 30}
केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार, काही राज्यांतील मंदिरे दि.8 जूनपासून खुली होत असली, तरीही राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील मंदिरे 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. दि. 8 जून रोजी संकष्टी चतुर्थी असली तरी दगडूशेठ मंदिर बंदच असून गर्दी करू नये, असे आवाहन दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

सध्या पुण्यात प्रत्येक क्षेत्रात हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर, बाजारपेठात गर्दी दिसत आहे.