💥 18 जूनला राज्यव्यापी जेलभरो आंदोलनाचा इशारा


⚡ सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत आज होणार्‍या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

💁‍♂️ निर्णय घेतला गेला नाही तर येत्या 18 जूनला राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्यावतीने देण्यात आला आहे.

🗣️ दोन महीन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली. आता सर्व व्यवसाय पुर्ववत सुरू करण्यात आले आहेत.

🧐 मात्र अनेकदा मागणी करूनही सलून व्यवसाय सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

💰 सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यास नियमानुसार परवानी द्यावी तसेच भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.

📍 या सर्व मागण्यांबाबत बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.