😱 जून अखेरपर्यंत भारतात 16 लाख कोरोनाबाधित होतील!


⚡ अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अनलॉक करण्याची घोषणा केली.

😰 परंतू लॉकडाऊन उठवल्याने भारतात जूनअखरेपर्यंत 16 लाख भारतीयांना कोरोनाची लागण होईल, असा धक्कादायक अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे.

📆 देशात 3 जून, 5 जून, आणि 8 जून अशा दिवशी अनलॉक होईल, त्यानुसार अनेक गोष्टींमध्ये शिथीलता दिली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली.

🧐 मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेने ही भीती घातल्याने लोकांध्ये एकच खळबळ माजली आहे.

😷 7 मार्चला देशात 7 कोरोना रूग्ण होते. महिन्याभरात म्हणजे 7 एप्रिलला देशात 4 हजार 289 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.
Maharashtra News
📍 आणखी एका महिन्याने ही संख्या वाढून 42 हजार 836 वर पोहचली. तर 7 जूनला मात्र कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला. आजपर्यंत ही संख्या जवळपास अडीच लाखांच्या आसपास पोहचली आहे.

💁‍♂️ देशात दररोज 9 ते 10 हजार नव्या कोरोनाग्रस्तांची देशात नोंद होते आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतल्या कोरोनाबाधितांचा आकडा मोठा आहे.