🚩 तिरुपतीचे मंदिर 11 जून पासून भाविकांसाठी खुले होणार


⚡ लाखो लोकांचे श्रद्धास्थान तिरुपती येथील वेंकटेश्वर बालाजीचे मंदिर लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर 11 जून पासून भाविकांना दर्शनासाठी खुले केले जात आहे.
[The Tirupati temple will be open to devotees from June 11]
💒 कोरोना मुळे देशभर लागू झालेल्या लॉक डाऊनमध्ये 20 मार्च नंतर मंदिर भाविकांसाठी बंद केले गेले होते.

⌛ 13 तास मंदिर खुले राहणार : मंदिर दररोज 13 तास खुले राहणार असून तासाला 500 भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत.

👏🏻 दररोज 6 हजार भाविकांनाच दर्शनाची संधी मिळणार आहे. तर 10 वर्षाखालील मुले आणि वृद्ध यांना सध्या तरी प्रवेश देण्यात येणार नाही.

🔎 भाविकांची तपासणी : दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रवास हिस्ट्री तपासली जाणार असून कोविड 19 तपासणीही होणार आहे.

💰 तिकीट दर : 300 रुपये दर्शन तिकीट घेणाऱ्यांना 8 जून पासून तिकीट ऑनलाईन मिळू शकेल तर बाकी 3 हजार मुफ्त दर्शन घेणाऱ्यांना त्याची नावे अगोदर रजिस्टर करावी लागणार आहेत.