💇‍♂️ क्वारंटाइन सेंटरमधील महिलेचे दागिने चोरीला

The woman's jewelry was stolen from the quarantine center

📌
अहमदनगर बातमी:
 राळेगण म्हसोबा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाइन असलेल्या घाटकोपर येथील महिलेचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली असून याबाबत तालुका पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मुंबई, पुणे आदी भागातून नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, 
💥 भारत टॉप दहा देशांच्या यादीत...
यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यानुसारच घाटकोपर येथून राळेगण म्हसोबा येथे आलेल्या एका महिलेला देखील गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, या महिलेचे मंगळसूत्र, नेकलेस, नथ, कानातील झुबे, 
💁‍♂️ एकाच कुटुंबातील तिघांचा खून; बीड हादरले    
असे जवळपास ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. हा गुन्हा काल रात्री साडेदहा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, क्वॉरंटाइन सेंटरमध्येच चोऱ्या सुरू झाल्याने क्वॉरंटाइन सेंटरच्या सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहेत.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर