⛈️पाऊस आणि 💡वीज गायब हे समीकरण काय आहे? । What is the equation of rain and avis disappear?



🔘 एप्रिल, मेमध्ये अवकाळी पाऊस आला की, हमखास विजेच्या खांबावर मोठा आवाज होतो आणि क्षणात वीजप्रवाह खंडीत होतो. नागरिक उकाड्याने हैराण होतात, "महावितरण'च्या संपर्क क्रमांकांवर तक्रारी यायला सुरुवात होतात. अधिकाऱ्यांना लाखोली वाहिली जाते. मात्र, पाऊस आणि वीज गायब हे समीकरण काय आहे, हे बहुसंख्य नागरिकांना माहितच नसते. याचे प्रमुख कारण आहे चिमणी.

चिमणी म्हणजे काय?
दचकू नका, विजेच्या खांबावर असणारी चॉकलेटी रंगाची पीन किंवा डिस्क इन्सुलेटर याला चिमणी म्हणतात. ती चिनी मातीची असते. डीपी स्ट्रक्‍चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर हेही चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सुलेटर महत्त्वाची भूमिका बजावते. उन्हाळ्यात हे इन्सुलेटर तापतात. पावसाचे दोन-चार थेंब पडले की त्याला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वीजप्रवाह खंडित होतो.

👉 अशीही काही कारणे
भूमिगत वाहिन्यांच्या कामांसाठी खोदकाम केले जाते. त्यात वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरुवात झाली की बिघाड होतो. संततधार पावसामुळे वाहिन्यांत आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टिंग व्हॅनच्या साह्याने भूमिगत वाहिन्यांतील दोष शोधला जातो. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येतो. पावसाळी वाऱ्याने वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट यंत्रणेत पाणी शिरल्यानेही वीजपुरवठा खंडित होतो.

👉 ढगांचे घर्षणही कारण
ढगांच्या घर्षणामुळे धनप्रभार निर्माण होतो. त्यातून निर्माण होणाऱ्या वीज जमिनीच्या पृष्ठभागाकडे आकर्षित होतात. त्याला अर्थिंग असे म्हणतो. ही प्रक्रिया घडत असताना विजेचे खांब आणि वाहिन्या आकाशातील विजेसाठी सोपे लक्ष ठरते. पर्यायाने वीज पडल्यावर वीजप्रवाह चालू असल्यास टीव्ही, ट्युबलाईट या सारख्या घरातील उपकरणांसह डिस्ट्रिब्युशन पॉइंटवरील (डीपी) उपकरणेही निकामी होतात.

👉 सतर्कता आवश्‍यक
 जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी, वादळे यामुळे वीजतारा तुटतात किंवा शॉर्टसर्किट होतात. वाऱ्यामुळे तारांमध्ये घर्षण होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे रोहित्रे, विजेचे खांब, तारा यातून ठिणग्या पडतात. वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता असते.

👉 खबरदारी हीच सुरक्षितता
🔘 वीज मीटरची जागा ओली होत असल्यास मीटरचा मुख्य स्वीच बंद करावा. 
🔘 तेथे कीटक किंवा चिमण्या आश्रयाला येतात. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊ शकते. 
🔘 ओलसर भिंतीस किंवा उपकरणांना हात लावू नये. 
🔘 मेनस्विचमध्ये फ्यूज वायर हवी. त्यामुळे शॉर्टसर्किटच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होतो.
🔘 तांब्याच्या एकेरी, दुहेरी तारांमुळे वीजपुरवठा खंडित होत नाही.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर