शिर्डीचे करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडले....


अहमदनगर बातमी: Ahmednagar News  देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानले जाणारे शिर्डीचे करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे कर्मचारी कपात आणि पगार कपातीचा विचार सुरू आहे. मात्र, तुळजापूर देवस्थान संबंधी हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या विरोधामुळे संस्थानपुढे पेच निर्माण झाला आहे. शिर्डी आणि भाविकांची गर्दी हे समीकरण कायमचेच. जेवढी गर्दी जास्त तेवढे संस्थान आणि शिर्डी शहराचे उत्पन्न जास्त, अशी परिस्थिती होती. त्यामुळे स्वत:चा अवाढव्य खर्च भागवून हे संस्थान विविध सामाजिक कामे आणि मदतही देत असे. एवढेच काय तर सरकारलाही मदत दिली जात होती. संस्थानचे वार्षिक उत्पन्न ६८० कोटी रुपये असून खर्च ६०० कोटी रुपये आहे. संस्थानमध्ये सुमारे सहा हजार कर्मचारी आहेत. त्यांच्यावर होणारा वार्षिक खर्च सुमारे १८७ कोटी रुपये आहे. याशिवाय १७ कोटी आजारी व्यक्तींना मदत म्हणून १४ कोटी रुपये शिक्षणावर तर एक कोटी रुपयांच्या आसपास वीज बिलाचा खर्च होतो. सध्या बंद असल्याने उत्पन्नात सव्वाशे कोटी रुपयांची घट झाली आहे. शिवाय बहुतांश कर्मचाऱ्यांना कामही नाही. त्यामुळे इतर उद्योग आणि कंपन्यांमध्ये जशी कर्मचारी आणि त्यांच्या पगारात कपात करण्यात येत आहे, तसाच विचार शिर्डी संस्थानने सुरू केल्याचे सांगण्यात येते. मात्र, याला विरोध होत आहे.