🤓 करिअर शिफ्ट करताय? मग लक्षात ठेवा!


हल्लीच्या परिस्थितीत अनेकांवर करिअर शिफ्ट करण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. मात्र असे अचानक करिअर शिफ्ट करणे धोकादायक आहे. अशावेळी खालील काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

1. केवळ बदल हवा म्हणूनच करिअर शिफ्ट करणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे होय. याबाबत बारकाईने विचार करून निर्णय घ्या.

2. पैसा हे सर्वस्व नाही, हे लक्षात घ्या. करिअर बदलल्यानंतर तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील असा विचार करणे चुकीचे आहे.

3. दुसऱ्यांचे अनुकरण म्हणून करिअर शिफ्ट धोकादायक बाब आहे. त्या क्षेत्रात जाऊन म्हणून मला खूप संधी आहेत, असा घरबसल्या विचार करून काही होणार नाही. 

4. करिअर बदलताना आपल्या क्षमता ओळखणे गरजेचे आहे. उत्साहाच्या भरात करिअर शिफ्ट करू नका.

5. कोणत्याही पर्यायाची निवड करताना जणू काही तो आपल्यासाठी शेवटचाच पर्याय आहे, असा विचार करुन त्याची निवड करु नये. यासंबंधी आपण द्विधा मन:स्थितीत असाल तर आधी स्वत:चे आकलन करा.

6. करिअरमध्ये बदल करण्यासाठी असे अचानक मोठे निर्णय घेऊ नये. याविषयी आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशीही चर्चा करावी. कदाचित ते आपली ही समस्या सोडवू शकतात.

Don't forget to share your friends !!! आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!